Latest Marathi News

BREAKING NEWS

पंचगंगा घाट, जुना शिवाजी पुल सुशोभीकरण
आराखड्याचे अंदाजपत्रक सादर करा – पालकमंत्री दीपक केसरकर

0

कोल्हापूर |

पंचगंगा घाट आणि जुना शिवाजी पुल सुशोभीकरण आराखड्याचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी जिल्हा वार्षिक योजना समितीकडे सादर करा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.

जुना शिवाजी पूल, पंचगंगा घाट, शाहू मिल येथे शाहू स्मारक आणि भवानी मंडप सुशोभीकरण आराखड्याचे आज महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कोल्हापूरला कुस्तीची मोठी परंपरा आहे. शाहू कालीन कुस्ती आखाड्यांची दुरुस्ती करुन कुस्तीपटुंना सुविधा मिळवून देण्यासाठी विशेष निधी मंजूर होण्याबाबत व जिल्हा क्रीडा संकुलाला 25 एकर जागा देण्याबाबत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. यासाठीचा प्रस्ताव क्रीडा विभागाने तात्काळ शासनाला सादर करावा.

शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी ‘शाहू मिल विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हायला हवी, असे सांगून शहराच्या विकासासाठी आवश्यक बाबींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यासोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

शिवभोजन केंद्रांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील शिवभोजन कामकाजाबाबत पालकमंत्री श्री केसरकर यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात सध्या 43 शिवभोजन केंद्रे सुरु असून 4 हजार 800 थाळ्या या योजनेंतर्गत वितरीत करण्यात येत असल्याची माहिती दत्तात्रय कवितके यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.