Latest Marathi News

BREAKING NEWS

नाट्य देवतेच्या सेवेस नेहमी प्राधान्य दिले – माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे

0

सोलापूर |

आपण नेहमी नाट्यसंमेलनाला सढळ हाताने मदत केली. सोलापूर आणि पंढरपूर येथील संमेलने यशस्वी करून दाखवली. त्याचबरोबर नाट्य कलेला प्रोत्साहन देऊन नाट्यदेवतेची सेवा करण्यास प्राधान्य दिल्याची भावना देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नूतन नियामक मंडळ सदस्यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सोलापुरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास नाट्य परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगूलवार, बार्शीचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, सांगोल्याचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, एडवोकेट सुजित कदम, दादा साळुंके, प्रशांत बडवे, पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे, काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात विजयकुमार साळुंके, दिलीप कोरके, प्राध्यापक अजय दासरी, विश्वनाथ आवड, सुमित फुलमामडी, तेजस्विनी कदम या सहा नूतन सदस्यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास मार्डीकर यांनी केले. संजय सावंत यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.