पुणे |
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने पाच दिवसांत 50 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे अनेक राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. आधी मध्य प्रदेश सरकारने नंतर उत्तर प्रदेश सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला. आता हरयाणा सरकारनेही हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून धर्मांतराच्या घटनेवर आधारित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी- चिंचवड येथे ३ शो मोफत दाखवण्यात येणार आहेत.
चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. चित्रपटगृहात ११ मे रोजी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या मोफत शोचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे यांनी सांगितले कि, ‘धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता- भगिनी अशा वृत्तीपासून दूर राहाव्यात, अशी आमची भावना आहे.
राज्य सरकारने धर्मांतर, लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही आम्ही विधानसभा अधिवेशनात केली होती’