मुंबई |
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोनने फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे. नुकतंच, टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या एलिट क्लबमध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. दीपिका पदुकोन टाइमच्या कव्हर पेजवर दिसणार्या काही भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. याबाबत दीपिकानं सांगितलं, ‘माझ्या देशात राहात असताना जगभरात प्रभाव पाडण्येच माझे ध्येय नेहमीच असणार आहे.’
दीपिकाने जगामध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली, ‘भारतीय सिनेमाने सीमा ओलांडल्या आहेत आणि आज भारतीय लोक सर्वत्र आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते.’