Latest Marathi News

BREAKING NEWS

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

0

मुंबई |

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीमध्ये राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून या विद्यापीठाच्या कामाला गती यावी. त्यासाठी समिती गठित करण्यात येईल, अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या बैठकीला माजी राज्यमंत्री आ. बच्चू कडू , उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.