Latest Marathi News

BREAKING NEWS

तुकाराम मुंडे… बस् नामही काफी है!

तुकाराम मुंडे... बस् नामही काफी है!

0

१९८५ साली माझी श्रमिक पत्रकार म्हणून माझी कारकीर्द सुरु झाली.. पहिल्याच टप्प्यात परभणी जिल्ह्यात १९८६ ते ८८ या काळात के.एल.प्रसाद,व्ही.रमणि,रामराव शिनगारे, उमाकांत दांगट, बाजीराव जाधव,एच.के.जावळे, नरेंद्र कवडे, विजयकुमार काळम-पाटील, कमलाकर फंड, यशवंत केरुरे,सुमंत भांगे, राधेश्याम मोपलवार यांच्या सारखी लोकाभिमुख कार्यपद्धती असलेली अधिकारी मंडळी संपर्कात आली.त्यापैकी ९९ टक्के आयुष्यभरासाठी जिवाभावाचे मित्रच झाले! महाराष्ट्राच्या प्रशासनातील मित्र जोडण्याचा आणि विश्वासाने जतन करण्याचा तेंव्हा सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम आहे.या प्रवासात अनेक अधिकारी संपर्कात आले. खरे तर चांगले प्रशासन आणि चांगले अधिकारी हे महाराष्ट्राचे बलस्थानच! मला जीवनात भेटलेल्या अधिकाऱ्यांवर भले मोठ्ठे पुस्तकच होईल. आज या सगळ्या आठवणी जाग्या होण्याचे कारण म्हणजे माझे नुकतेच प्रकाशित झालेले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक आणि त्यात ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे! या पुस्तकात अंतर्भूत असलेल्या व्यक्तिमत्त्वांत तुकाराम मुंडे हेही आहेत.महाराष्ट्राला त्यांची ओळख करुन देण्याची गरजच नाही,कारण तुकाराम मुंडे.. सिर्फ नामही काफी है! एक अधिकारी आणि माणूस म्हणून मला दिसलेल्या तुकाराम मुंडे यांची मी नोंद पुस्तकात घेतली आहे.चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्राची फ्रेम आणि पुस्तक भेट देण्यासाठी मुंडे सध्या कार्यरत असलेल्या मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात गेलो होतो.”पंढरपूर” पासून “नागपूर”पर्यंतच्या वैविध्यपूर्ण विषयांवर मस्त गप्पा झाल्या…

Leave A Reply

Your email address will not be published.