Latest Marathi News

BREAKING NEWS

तब्बल दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष भेटणार आहोत!!

0

तब्बल दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष भेटणार आहोत!!

 

तब्बल दोन वर्षांच्या अवधीनंतर प्रिसिजन गप्पा प्रत्यक्ष होतायत. पुन्हा एकदा माहोल जमणार..!

मागच्या दोन वर्षांचा ऑनलाईन गप्पांचा प्रतिसाद उत्तमच होता. ऑनलाईन गप्पांचा एक फायदा असा झाला की, जगभरातील मराठी रसिकांना प्रिसिजन गप्पांची ओळख झाली. अगदी परदेशातूनही पसंतीची पावती मिळाली.

 

गप्पांचा पहिला दिवस आणि सुगम संगीताची मेजवानी असा सिलसिला गेली काही वर्ष चालू आहे . २०२० च्या गप्पांमध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची मुलाखत आणि त्यांच्या गाण्यांवर आधारित सुरेल कार्यक्रम झाला तो आजही रसिकांच्या स्मरणात आहे. २०२१ मध्ये अगदी वेगळा प्रयोग केला. “अभंग रीपोस्ट” हा अनोखा बँड आणि “भाडिपा” या अफलातून युट्यूब प्लॅटफॉर्म चे सारंग साठे आणि निपुण धर्माधिकारी यांची मुलाखत असा एकत्रित कार्यक्रमदेखील सगळ्यांना आवडला. आजही दिवसेंदिवस या कार्यक्रमाचे दर्शक वाढतायत…!

 

ही सगळी गंमत पुन्हा अनुभवायची आहे.. प्रत्यक्ष कार्यक्रमात.. याची देही याची डोळा!!

यावर्षी सुगम संगीताचा एक अफलातून कार्यक्रम अनुभवायचा आहे..!!

 

तेंव्हा आपल्या तारखा राखून ठेवा!!

दिनांक १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२२

स्थळ : शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.