Latest Marathi News

BREAKING NEWS

“डीबी इज बॅक इन ॲक्शन… !”

0

✒️जमीर काझी , मुंबई

इंटरनॅशनल सिटी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांचीनियुक्ती होण्यामुळे पोलीस वर्तुळाबरोबरच विविध घटकांतून मतमतांतरे व्यक्त होत होणे साहजिकच आहे.

विशेषत: गेल्या तीन वषार्पासून अडगळीत पडलेल्या भारती यांच्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर विशेष आयुक्तपदाची निर्मिती केल्याने त्याला असाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. राज्याची धुरा पाच वर्षे व गेली सहा महिने धरून साडेपाच वर्षे गृह खात्याची धुरा सांभाळत असलेल्या विद्यमान उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचे दिर्घकालीन परिणाम मुंबई व महाराष्ट्राच्या पोलीस दलावर होणार आहेत.

देवेन भारती यांच्या नियुक्तीमागे अनेक कंगोरे असले तरी सर्वात पहिल्यांदा परिणाम अपेक्षित असेल तर तो आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूका. भाजपाचे ‘मिशन बीएमसी’ फत्ते करण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न पणाला लावले आहेत, त्यामुळे भारती यांना स्पेशल सीपी बनविणे, हा त्या धोरणाचा भाग ही अशू शकतो. अशी चर्चा खात्यातील एका गटात रंगत आहे. खरे तर फडणवीस जेव्हापासून गृह खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

तेव्हापासून त्यांनी आयपीएसच्या प्रत्येक स्तरावरील आपल्या विशेष मर्जीर्तील अधिकाऱ्यांची एक अदृष्य फळी निमार्ण केलेली आहे. अजातशत्रू असलेल्या मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचाही त्यामध्ये समावेश असलातरी ‘टॉप -टू’मध्ये रश्मी शुक्ला यांच्यानंतर देवेन भारतीचाच नंबर लागतो. राज्यातील सत्तांतरानंतर शुक्ला यांची ‘घरवापसी’ करुन महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखपदी बसविण्याच्या (डीजीपी) त्यांच्या योजनेला पुणे सत्र न्यायालयाने फोन टॅप प्रकरणी पुणे पोलिसांचा ‘सी समरी क्लोझर रिपोर्ट’ फेटाळून लावल्याने दिर्घकाळासाठी लांबणीवर पडला आहे. त्याच्या तुलनेत काही गंभीर आरोप असलेल्या देवेन भारती यांच्याविरुद्धात तांत्रिकदृष्ट्या कोणताही सबळ पुरावा नाही. त्यामुळे त्यांची निवड करण्यात शिदें-फडणवीस सरकारला केवळ निर्णय घ्यावयाचा होता. फडणवीस यांच्या निर्णयामुळे अनेक अतिवरिष्ठ आयपीएस व पोलीस दलातील एक घटक दुखावले गेले असलेतरी त्यांना हाताळत राहण्याशिवाय तुतार्स अन्य कोणताही पयार्य नाही. कारण भारती हे
महाविकास आघाडी सरकारच्या ‘हिटलिस्ट’वर होतेच. शिवाय फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईचे आयुक्त झालेल्या संजय बवेर् यांचेही त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट मत होते.

परमबीर सिंह यांच्या १०० कोटी हप्ता वसूलीच्या कथित आरोपानंतर बदलेल्या परिस्थितीत एखादा ‘जॅकपॉट’ लागल्याप्रमाणे पहिल्यादा डीजीपी आणि नंतर मुंबईचे आयुक्तपद मिळालेल्या संजय पांडे हे तर ‘होमगार्ड’ला
असल्यापासून भारती यांच्या मागे केवळ हातच नव्हे तर सर्व काही धुवून मागे लागले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी शक्यत ते सर्व प्रयत्न त्यांच्याकडून झाले होते. मात्र केवळ संशयास्पद अधिकारी आणि सखोल तपासाची गरज, या दोन निष्कषार्च्या पुढे त्यांना अहवाल बनविता आला नाही. पांडे यांची खूनशी प्रवृत्तीमुळे अनेक अधिकाऱ्यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती किंवा दिर्घरजेवर जाणे पसंद केले. मात्र भारती त्यांना पुरुन उरले होते. प्रचंड रोष असताना जराही विचलित न होता चौकशीला सामोरे गेले. पांडे हे सुरक्षा महामंडळाचे प्रमुख असल्याने ‘बॉस’ ला भेटायला यावे लागते, असे त्यांनी मला डीजी ऑफिसच्या व्हरांड्यात हसतपणे सांगितले होते.

१९९४ च्या आयपीएस बॅचच्या या छोट्या चणीच्या अधिकाऱ्याची ‘रिझल्ट ओरियन्टेड’ काम करण्याची पद्धत, आवाका आणि त्यांचे मुंबईतील नेटवर्कच्या बाबतीत आजच्या घडीला कोणी जवळपास पोहचू शकत नाही, हे वास्तव आहे. मुंबईतील क्राईम, गँगवाॅरबाबत ‘एनसायक्लोपिडीया’ समजल्या जाणाऱ्या राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भारतीनंतर त्यांचे कट्टर वैरी बनले. मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्याबद्दलची खदखद व्यक्त केली. मात्र त्यावेळी केवळ काही दिवसांच्या चचेर्शिवाय त्याचा काहीही परिणाम भारती यांच्यावर झालेला नव्हता.

मुंबई पोलीस दलात या पदाच्या निमिर्तीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या आस्थापनेवरील संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी” हे एडीजी’चे पद वर्ग करण्यात आले., मुंबईतील सर्व पाचही सहआयुक्त देवन भारती यांना रिपोर्ट करणार असल्याने ते दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी बनतील. मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख बनण्याची त्यांची इच्छा तत्कालिन परिस्थितीमुळे पुर्ण झाली नव्हती. मात्र आता ‘स्पेशल सीपी’मुळे त्यांच्याकडे पूवर्पप्रमाणेच अघोषितपणे सवार्धिकार असतील, हे निश्चित आहे. मुंबईत प्रदिर्घ काळ सेवा झाल्याने देवेन भारती यांना महानगरातील गुन्हेगारी जगताची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होवू शकतो. राहिता राहिला विशेष आयुक्त पदाचा विषय तर जोपर्यत फडणवीस यांच्याकडे सत्ता आहे, तोपर्यत अन्य अधिकारी, राजकारण्यांनी कितीही छुप्या व उघडपणे ठोकबाजी केली तरी त्यांचा काहीही परिणाम होणार नाही.भविष्यात यदाकदाचित राज्यात सत्तांतर झाल्यास हे पद संपुष्टात आणले जाईल. पण त्यासाठी पूलाखालून बरेच पाणी वाहून जावे लागेल. तुर्तास मुंबईकरांच्या रक्षणाची जबाबदारी आलेल्या देवेन भारती यांना चांगले काम करुन मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी नोंद करण्यासारखे काम करण्यासाठी मनापासून शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.