Latest Marathi News

BREAKING NEWS

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची सुवर्ण कामगिरी ; ७१ व्या ऑल इंडिया पोलीस गेम्स पुणे मध्ये महाराष्ट्र पोलिसला सुवर्ण पदक

0

पुणे |

सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकविणारे सहायक पोलिस आयुक्त कुस्तीगीर विजय चौधरी ह्यांनी यंदाच्या ऑल इंडिया पोलीस गेम स्पर्धेत कुस्ती खेळासाठी महाराष्ट्रा पोलिसांचं प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. वानवडी येथील एसआरपीएफ ग्रुप १ येथे या स्पर्धा पार पडल्या.

मूळचे जळगाव जिल्ह्यातील ता.चाळीसगाव सायगाव येथील रहिवासी असलेले चौधरी हे सध्या पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत स्वारगेट विभागात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. चौधरी यांनी १२५ किलो हेवीवेट वजन गटात CISF ,पंजाब ,J&K ,हरयाणा पोलीस या कुस्तीपटू वर विजय मिळवत सुवर्ण पदकावर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव कोरले.

हिंद केसरी पै .रोहित पटेल यांच्याकडून त्यांनी खेळाचे प्रशिक्षण घेतले. २०१८ साली राजस्थान मध्ये झालेल्या स्पर्धेत चौधरी यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती. यंदाच्या स्पर्धेत त्यापेक्षाही चांगली कामगिरी करण्याचा मानस चौधरी व त्यांचे मार्गदर्शक वस्ताद पै रोहित पटेल यांनी व्यक्त केला होता. कोरोनाच्या साथीमुळे तब्बल दोन वर्षांनंतर ही स्पर्धा घेण्यात आली. पैलवान विजय चौधरी यांनी 2019 सालच्या पराभवानंतर अथक परिश्रम व सचोटीने आणि अत्यंत संयम बाळगून महाराष्ट्र पोलीस दलासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे त्यांचे हे स्वप्न उराशी बाळगून ठेवले होते. संपूर्ण भारतात महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावल्याने एसीपी विजय चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच आगामी काळात होणाऱ्या वर्ल्ड पोलीस गेम्स स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी करण्याचा निर्धार पैलवान विजय चौधरी यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.