Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्ररथाला मुख्य निवडणूक अधिका-यांनी दाखवला हिरवा झेंडा विविध शासकीय योजनांची करणार प्रसिद्धी

0

नागपूर |

माहिती व जनसंपर्क कार्यालयाने आयोजित केलेल्या चित्ररथ प्रदर्शनीला आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नासुप्र सभापती मनोजकुमार सुर्यवंशी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवला.

नागपूर जिल्ह्यात सर्वदूर चित्ररथ जाणार असून या चित्ररथाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाणार आहे. सर्वसाधारण आणि अनुसुचित जातीच्या योजनांच्या माध्यमातून हे चित्ररथ जिल्हाभर योजनांची प्रसिद्धी करणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी चित्ररत्र उभे राहून योजनांची माहिती दिली जाईल.
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत विविध पुस्तके, पॅाम्पलेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचविली जाणार आहे. विविध योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून विशेषत्वाने दिली जाणार आहे. शासकीय योजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.