Latest Marathi News

BREAKING NEWS

“चंद्रकांत पाटील यांचे बाळासाहेब ठाकरें यांना अभिवादन..!”

0

पुणे |

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत राज्यात सरकारची स्थापना केलेली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले आहे.

याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटील यांनी त्याच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.