Latest Marathi News

BREAKING NEWS

“खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील…!” – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

रामचंद्र अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालय लोणीकंद, येथे तंत्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने आयोजित आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनांतर्गत राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. या वेळी राज्य शासन खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळामध्येही प्राविण्य मिळवावं,असं आवाहनही विद्यार्थ्यांना केलं.

या वेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल बांदल, महाविद्यालयाचे अध्यक्ष मारुती भुमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.