Latest Marathi News

BREAKING NEWS

“कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या महाविकास आघाडीला धडा शिकवा…” – चंद्रशेखर बावनकुळे

0

पुणे |

कोरोनाचे  संकट असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांना मदत करण्याऐवजी दारूवरील कर कमी केला. कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये धक्का द्या असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कसबा विधानसभा मतदारसंघात  महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणी मेळावे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. मोदीजींना साथ द्यायची असेल तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासने यांना मतदान द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.