अकलूज |
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शिवरत्न बंगला अकलुज येथे भेट देवुन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री महोदयांकडे चौंडी ते इंदौर रेल्वे दवारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी ते कर्मभुमी जोडण्याबाबत मागणी केली.
जेऊर-चौंडी-आष्टी हा ७८ कि.मी च्या रेल्वे मार्गाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभु यांनी तत्कालीन खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागणीची दखल घेवुन सन २०१६ मध्ये सर्वेक्षणाला मंजुरी देवुन सन २०१७ च्या अर्थसंकल्पात १ हजार ५६० कोटी रु तरतुद करण्यात आली होती.

जेऊर ता-करमाळा येथून निघालेला हा मार्ग आष्टी येथे अहमदनगर-परळी या मार्गाला जोडणे अभिप्रेत आहे.त्यामुळे पंढरपूर-करमाळा-चौंडी-आष्टी- अहमदनगर-शिर्डी-इंदौर असा नवा मार्ग तयार होणार आहे.त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी आणि कर्मभुमी जोडली जाणार असुन अहिल्यादेवींनी जिर्णोद्धार केलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर,पंढरपुर बरोबर,श्री कमलाभवानी माता मंदिर,करमाळा व शिर्डी येथील साईबाबा देवस्थान ही जोडले जाणार आहे.