*कुर्डुवाडीच्या माईलस्टोन पब्लिक स्कुलचं अनोखं यश.*
कुर्डुवाडी-19 ” दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा ” नवी दिल्ली येथे दि १३ व १४ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या राष्ट्रीय हापकिडो बाॅक्सींग स्पर्धेत माईलस्टोन पब्लिक स्कूल कुर्डुवाडी च्या खेळाडूंची ४ पदकांची कमाई
१) आर्या महावीर घोडके – सुवर्ण पदक
२) श्रेया शिवाजी गवळी – रौप्य पदक
३) अथर्व हनुमंत चव्हाण – रौप्यपदक
४) ओम प्रशांत त्रिंबके -रौप्यपदक
देशभरातुन विविध राज्यातून आलेल्या खेळाडू मध्ये माईलस्टोन पब्लिक स्कूल कुर्डुवाडी च्या खेळाडूंनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे देशात महाराष्ट्राचे नाव उंचावले, महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .खेळाडूंना शिंदे सर गोडसे सर, जाधव सर साळवी सर यांनी मार्गदर्शन केले .
खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब जगताप, मुख्याध्यापिका सौ नागरे मॅडम व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले