Latest Marathi News

BREAKING NEWS

कारले येथे एकविरा आईच्या मंदिर परिसरात प्रशिक्षणार्थी पोलिसांनी केली साफसफाई ; गोरगरिबांसाठी अल्पपोहाराचे वाटप

0

खंडाळा |

११ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या वतीने कारले येथील एकविरा आई मंदिर येथे श्रमदान करण्यात आले. श्रमदान हेच सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना लक्षात घेऊन परिसर स्वच्छ व चकाचक करण्यात आला. दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेमध्ये हे श्रमदान करण्यात आले. व गोरगरीब लोकांसाठी अल्पकाराचे वाटपही करण्यात आले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील सोशल क्लबच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष कसबे, राखीव पोलीस निरीक्षक संजय पराड कॉन्स्टेबल वारे यांच्यासह एकूण ५० महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी कारले येथील एकविरा आई मंदिर देवी येथे श्रमदान कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण परिसर पायथ्यापासून ते देवीच्या मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या झाडून स्वच्छ केला व त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. दरम्यान त्यांनी गोरगरीब लोकांना अल्पोपहार वाटप करण्यात केला येणाऱ्या भाविकांनी पोलिसांचे अभिनंदन केले

Leave A Reply

Your email address will not be published.