Latest Marathi News

BREAKING NEWS

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या मुख्य मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाच उदघाटन केल्यामुळे भाजपकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसले.

चंद्रकांत पाटील यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. हेमंत रासने हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराचा नारळ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वाढवण्यात होता. आता कसबा मुख्य मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

कसबा विधानसभा मतदारसंघात आपल्या भारतीय जनता पक्षाचा विजयी झेंडा फडकवण्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. भाजपकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. भाजप या प्रचाराच्या शर्यतीत पुढे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पदयात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरु आहे. या पदयात्रांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शैलेंद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, किरण साळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.