Latest Marathi News

BREAKING NEWS

ओला दुष्काळ जाहिर करा; अखिल भारतीय किसान सभा सोलापूरच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धरणे आंदोलन

0

सोलापूर |

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहिर करा यासाठी 23 ते 26 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर तालुक्यात मंदृप तहसील कार्यालयावर आज धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलन अखिल भारतीय किसान सभा सोलापूर जिल्हाच्या वतीने आयोजित करण्यात आले.

प्रमुख मागण्या :-

1) महाराष्ट्र राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा.
2) परतीच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केकेल्या एकरी 50 हजार रु नुकसान भरपाई तात्काळ द्यावी.
3) सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी किमान 3 हजार रुपये हमी भाव द्यावे.
4) शेतकऱ्यांची वीज कट न करता वीज बिल माफ करावे. आणि विज पुरवठा मोफत करावा.
5) नवीन वीज विधेयक रद्द करावे.
6) शेतकऱ्यांचे संपूर्ण खरीप कर्ज माफ करा.
7) हमीभाव देणारा कायदा करा.
8) पिक विमा मंजूर करून तात्काळ वाटप करा
यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष किसान सभा- डॉ शिवानंद झळके, जिल्हा सचिव सुलेमान शेख. यांनी मार्गदर्शन केले कोषाध्यक्ष कुंभार, तालुका अध्यक्ष जावेद अवटे, यासीन मकानदार,महादेव पांढरे, रज्जाक मकानदार, आदी या वेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.