Latest Marathi News

BREAKING NEWS

एसआरपीएफ कॅम्पमधील रस्ता नागरिकांसाठी खुला
कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडविणार : आमदार सुभाष देशमुख

0

सोलापूर |

एसआरपीएफ कॅम्पमागील नागरिकांसाठी कायमस्वरूपी पर्यायी रस्ता करून देऊ तोपर्यंत एसआरपीएफ कॅम्पमधून जाण्यास अडथळा करू नका, अशी सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी एसआरपीएफ अधिकार्‍यांना केल्यानंतर हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
एसआरपीएफ कॅम्पमध्ये काही घटना घडल्यामुळे कॅम्पमागे असलेल्या रक्षक पार्क, अश्विनी सोसायटी, गजानननगर, विष्णूनगर, साईनगर आदी सोसायट्यांतील नागरिकांना कॅम्पमधून विजापूर रस्त्याला जाण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार देशमुख यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. त्यापार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी या परिसराची पाहणी करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

एसआरपीएफचे सहायक समादेशक नानासाहेब माशाळ, सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार टिंगरे व नगर अभियंता लक्ष्मण चलवादी या अधिकार्‍यांची बैठक घेऊन येथील नागरिकांना कायम स्वरूपी रस्ता कसा करून देता येईल, याबद्दल चर्चा केली. आमदार देशमुख यांचे एसआरपीएफ कॅम्पच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच येथील नागरिकांतर्फे आमदार देशमुख यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन शिवानंद मठपती यांनी सत्कार केला. कॅम्पमधील रस्ता खुला करून दिल्याबद्दल येथील नारिकांनी आमदार देशमुख व एसआरपीएफ अधिकार्‍यांचे आभार मानले. यावेळी शिवानंद मठपती, महेश देवकर, शिवराज सरतापे, संतोष म्हेत्रे, बसू वाघमारे, किशोर आंबेवाले, प्रकाश माने, आरीफ कबीर दीपक आंबेवाले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.