Latest Marathi News

BREAKING NEWS

एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

0

पुणे |

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या कोथरूड मतदार संघाचा दौरा केला. त्यांनी आपल्या या मतदारसंघातील एरंडवणे भागातील समस्या जाणून घेतल्या. या समस्यांबाबत चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली . या समस्या दूर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत एक बैठक घेत , या सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच विविध सोसायटीमध्ये ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्यासाठी आश्वस्त देखील केले. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.