पुणे |
परीक्षा म्हणजे टेन्शन. या परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून देशभरात ‘एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धा’ २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोथरूड मतदारसंघातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत भेट दिली. पंडित दीनदयाळ शाळेतही हि स्पर्धा झाली. मुलांनी काढलेल्या कलाकृती पाहून अतिशय अभिमान आणि समाधान वाटलं, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, माझ्या कोथरूड मतदारसंघातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत भेट दिली आणि सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोरोना लसीकरणामध्ये भारत नंबर एक, सर्जिकल स्ट्राईक, G20, विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, बेटी बचाव बेटी पढाओ, आजादी का अमृत महोत्सव अशा विविध विषयांवरील या मुलांनी काढलेल्या कलाकृती पाहून अतिशय अभिमान आणि समाधान वाटलं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देता यावा आणि परीक्षा देण्यापूर्वी वातावरण तणावरहित करता यावे या उद्देशाने ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पराक्रम दीना निमित्त एका देशव्यापी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील संकल्पनांवर विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षा योद्धे कसे होता येईल, हि या स्पर्धेची मध्यवर्ती कल्पना होती.

शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील….