नागपूर |
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाला आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही नागपूरला गेले आहेत. ठाकरे पिता-पूत्र विदर्भाच्या धर्तीवर पोहोचल्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरे यांचं नाव ‘बापू’ आहे, तर आदित्य ठाकरे यांचं नाव ‘पप्पू’ आहे. त्यांनी अधिवेशनाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पडू द्यावं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये, राजकारण करू नये, अशी टीका रवी राणांनी केली. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ जारी करत टीकास्त्र सोडलं आहे.