Latest Marathi News

BREAKING NEWS

….आणि प्रतिक्षा संपली! ; यावर्षीच्या संगीत महोत्सवात रंग भरण्यासाठी येतायत दिग्गज कलाकार..

0

सोलापूर |

शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी सा रे ग म लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैशंपायनचं शास्त्रीय गायन..! मुग्धाला आजवर आपण सुगम, चित्रपट गीते गाताना ऐकलं आहे… शास्त्रीय मैफल या महोत्सवात ऐकता येईल. शनिवारीच दुसर्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक पंडित नयन घोष यांचं सतारवादन. त्यांना तबल्यावर साथ करतील त्यांचे चिरंजीव ईशान घोष…

रविवार, दिनांक २२ जानेवारी रोजी पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य आणि शास्त्रीय – उपशास्त्रीय गायक पंडित अमोल निसळ यांचे गायन होईल. तर दुसर्या सत्रात प्रख्यात बासरीवादक पं. रोणु मजुमदार यांचं बासरीवादन होईल.

समस्त सोलापूरकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी मोफत प्रवेशिका उद्या मंगळवार दिनांक १७ जानेवारीपासून सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या नेळात हुतात्मा स्मृति मंदिर येथे उपलब्ध आहेत…

प्रिसिजन संगीत महोत्सव २०२३
शनिवार, दिनांक २१ जानेवारी २०२३
रविवार, दिनांक २२ जानेवारी २०२३
वेळ ः दररोज संध्याकाळी ६.२५ वाजता
स्थळ ः हुतात्मा स्मृति मंदिर सोलापूर.

आपल्या प्रवेशिका त्वरीत घ्याव्यात, ही विनंती.

Leave A Reply

Your email address will not be published.