Latest Marathi News

BREAKING NEWS

“आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न…!”

0

पुणे |

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे आंबेगाव येथे साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज १९ फेब्रुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान,यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

शिवसृष्टीच्या या पहिल्या चरणात शिवचरित्रातील अनेक प्रसंग उभारण्यात आले असून, त्यांची पाहाणी अमित शहानी केली.
लवकरच छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक घटनांचा पट उलगडणारं आशिया खंडातलं हे सर्वात मोठं स्थान ठरेल, असा विश्वास या निमित्तानं अमित शहा यांनी व्यक्त केला.

या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, खा. विनयजी सहस्रबुद्धे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानाजी जाधव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीशजी कदम यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.