अशोकराव चव्हाण यांना भावले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं…
अशोकराव चव्हाण यांना भावले "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं...
सप्रेम नमस्कार,
१९९०चे दशक देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची हुकुमी सत्तेचा तो काळ! त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीचा संघर्षही टिपेला पोहोचलेला होता.मी लातूरमध्ये दै.एकमतचा संपादक होते.स्वर्गीय विलासरावजी देशमुख राज्याचे महसूल आणि सांस्कृतिक कार्य मंत्री होते आणि अशोकराव चव्हाण नगरविकास राज्यमंत्री होते.त्याच काळात माझ्या एकमत मधील निवडक अग्रलेखांच्या संग्रहाचे माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले होते.स्वर्गीय विलासरावजी मोठे हौशी आणि आपल्या माणसाचे कौतुक करण्यात कुठलीही कसर राहणार नाही याची विशेष काळजी घेणारे! त्यांच्या त्या पिंडानुसार त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थेट मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची सूचना लातूरचे तत्कालिन नगराध्यक्ष स्वर्गीय एस.आर.काका देशमुख यांना दिली.स्वर्गीय एस.आर.काका साहेबांना अक्षरशः आपले दैवतच मानायचे! त्यामुळे तो कार्यक्रम दणक्यात झाले आणि त्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्व.साहेबांच्याच इच्छेनुसार अशोकराव चव्हाण उपस्थित होते. त्या सोहळ्याची आणि अशोकरावांची आज आवर्जून होण्याचाही कारण घडले. माझ्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” पुस्तकातील ७५ मान्यवर व्यक्तिमत्त्वांतील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व अशोकराव चव्हाण हेही आहेत. ते पुस्तक आणि पुस्तकातील ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्राची फ्रेम त्यांना भेट देण्यासाठी मुंबईतील चर्चगेट जवळील कार्यालयात गेलो आणि वरील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अशोकरावांचा आणि माझा स्नेह तसा १९८७ पासूनचा.त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात नुकताच प्रवेश केला होता आणि मी लोकमतच्या परभणी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो.असो.आज त्यांना “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” उपक्रम त्यांना मनापासून भावला.अशोकरावांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ,
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.