अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांचे
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सांत्वन
कोल्हापूर |
पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन दुःख व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी व वळीवडे येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची तसेच जखमी वारकऱ्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जुनोनी येथे अपघातात मृत्यू झालेल्या वळीवडे, ता. करवीर येथील कै. सुनीता उत्तम पवार व गौरव उत्तम पवार व जठारवाडी, ता. करवीर येथील कै.शारदा आनंदराव घोडके, कै.सर्जेराव श्रीपती जाधव, कै.सुनीता सुभाष काटे, कै.शांताबाई जयसिंग जाधव, कै. रंजना बळवंत जाधव यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्या दु:खामध्ये सहभागी असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच जखमी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन त्यांना धीर दिला.