या प्रश्नाची उकल काल कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेचा डॉ. कुंताताई नारायणराव जगदाळे जीवन गौरव पुरस्कार 2025 विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चि.अभयला प्रदान करण्यात आला, सदर पुरस्कार वितरण प्रसंगी मलाही व्यासपीठावर उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचा मान दिला.
वडिलांना सन्मानित करताना व्यासपीठावर मुलांना बोलावण्यात येत नाही. मात्र मुलांचा सन्मान करताना वडिलांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावून संयुक्तिक पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान प्राप्त होतो यातून वरील प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळतं. आपल्या पाल्याचे कर्तृत्व व्यावसायिक व सामाजिक स्तरांवर उजळणं त्यांना सार्वजनिक स्तरावर सन्मानित करताना मान्यवरांकडून मनोगतात कोडकौतुकाचा वर्षाव होणं पालकांसह कुटुंबांस यापेक्षा वेगळं काय अपेक्षित असतं ?
तसं पाहिलंत तर आपली मुलं कर्तृत्वात माहीर समाजात आदर्श व कुटुंबांत प्रिय आणी महत्वाचं म्हणजे देशातील संविधानाचे पालन करणारी असल्यानंतर त्यांचे कुटुंबीय खऱ्याअर्थाने जगभरात समृद्धच…
समस्त चव्हाण कुटुंबीयांकडून संस्थेचे आभार.
मुरलीधर चव्हाण, राष्ट्रीय समन्वयक,
डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र.
