Latest Marathi News

BREAKING NEWS

कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!

0

सध्याला याची देही याची डोळा आपण पाहतो कलियुगात अप्रिय असंख्य कारनामे तरीही माणुसकीचा सुगंध मात्र चोहीकडे दरवळतोय. हे अनाधिकालापासून समकालीन समाजवर्ग अनुभवत, पहात आलाय. अनेक विद्वान संत, महापुरुष, शास्त्रज्ञांनी निस्पृह योगदान देत समाजात विश्वास वृद्धींगत करण्यात यशस्वी होत अहोरात्र समाज हितास पूरक परिश्रम घेतलेत.

अश्या व्यक्तिमत्वांची नुसती भेट नव्हे तर त्यांचा प्रत्यक्षात सहवास लाभणं निखळ पर्वणीच.

इथं हे मांडण्याचं कारण विविध उद्योग विश्वात यश संपादन करून जगात कुबोटा ट्रॅक्टर विक्रीत प्रथम क्रमांक पटकावून समाजात नावलौकिक मिळवलेलं व्यक्तिमत्त्व संतोषकाका ठोंबरे व कुटुंबीय यांचा सामाजिक स्तरावरील प्रवास अनुकरणीय असाच राहिलाय.

संतोषकाकांना उद्योजक उपाधी लाभलेली आहे, त्या सोबतच त्यांना दातृत्वाचा सागर म्हंटल तर वावगे ठरणार नाही त्याचं कारण असं विविध क्षेत्रातील दातृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांना एकत्र करून मातृभूमी प्रतिष्ठानची निर्मिती पुढे संस्थेची भव्य जमीन (स्थावर मालमत्ता ) व सुरु असलेले विविध कार्य.. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेंतर्गत निराधार, सर्वांगीण दुर्बल शेकडो लोकांची भूक शमवण्याचा यज्ञ दशकांहून अधिक वर्षकाळ अखंडित तेवत ठेवलाय. याच समाज घटकांतील व्यक्तींसाठी नुकताच आधुनिक सोयीने युक्त भगवंत नेत्रालायाचाही प्रारंभ करण्यात आलाय. भगवंत नेत्रालायातून डोळ्याचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार व ऑपरेशनची निकड असल्यास ऑपरेशन्स मोफत करण्यात येणार आहेत. असाहाय्य निराधार सर्वांगीण दुर्बल घटकातील व्यक्तींना वरील दोन्ही प्रकल्प अक्षरशः वरदान ठरलेत.

मातृभूमी प्रतिष्ठान व त्यांचे कार्य राज्यासह देशात दिशादर्शक ठरावं यासाठी प्रतिष्ठान कोअर कमिटी सदस्य, संचालक मंडळ व सदस्य.. प्रयत्नशील आहेत.

अन्नपूर्णा योजना व भगवंत नेत्रालाय दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प समाजातील दानशूर व समाजभान असलेल्या थोर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व्यक्तींच्या व प्रतिष्ठान समस्त सदस्यांच्या पाठबळावर निर्विघ्न उभारली आहेत. उल्लेखनीय म्हणजे पाठबळाचा बहुतांश भार संतोषकाकांनी आपल्या खांद्यावर घेतलाय. मातृभूमी प्रतिष्ठानमध्ये त्यांच्याच विचारसरणीच्या विविध क्षेत्रात कार्यरत महनीय व समाजभान असलेल्या व्यक्ती मार्गदर्शक, संचालक व सदस्य पदावर आपापलं दायित्व बजावण्यात अग्रेसर आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष काकांच्या ह्या सबंध व्यवसायिक व सामाजिक स्तरावरील प्रवासात खंबीर साथ त्यांचे संपूर्ण कुटुंबीय मोठ्या मनाने देताहेत.

संतोषकाकांची विचारसरणी अतिशय सकारात्मक असून ते आलेल्या अडचणींना देखील लाभलेला प्रसाद समजून सामोरे जातात. समाजातून लाभणारी अर्थप्राप्ती समाजाच्या कामी यावी ही धारणा बाळगून त्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात आणि इतरांकडूनही त्यांची हीच अपेक्षा असते..

कविवर्य दत्ता हलसगीकर सरांच्या कवितेतील काही ओळींद्वारे संतोषकाका समाजाला संदेश देताहेत याची प्रचिती येतेय.

ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत.

आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे.

नक्कीच समाजात ह्या संदेशाचं पालन अधिकाधिक व्यक्ती कडून होईल अशी अपेक्षा.

अभिनंदन ! संतोषकाका व मातृभूमी प्रतिष्ठान समूह.. मातृभूमी प्रतिष्ठान कडून भविष्यात समाजाभिमुख व अतुलनीय कार्याच्या पर्वतरांगा.. निर्माण व्हाव्या, सदिच्छा-शुभेच्छा..!!

मुरलीधर चव्हाण,
राष्ट्रीय समन्वयक,
डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना, मुंबई.

Leave A Reply

Your email address will not be published.