Latest Marathi News

BREAKING NEWS

कॅप्री ग्लोबल कॅपिटल कडून ४०० कोटी पर्यंतच्या सुरक्षित, मानांकित, सूचिबद्ध, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्याच्या (NDC ) सार्वजनिक विक्रीची घोषणा

0

मुंबई, २४ सप्टेंबर २०२५: कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (“कंपनी”) ने ₹१,००० दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, मानांकित, सूचिबद्ध, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (“एनसीडी” किंवा “रोखे”) सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे, ज्याची रक्कम ₹२०० कोटी (“बेस इश्यू साईज”) आहे, ज्यामध्ये जास्त भरणा झाल्यास ₹४०० कोटीं (“इश्यू”) पर्यंतच्या रकमेपर्यंत (“ग्रीन शू ऑप्शन”) ओव्हरसबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय आहे.या रोखे विक्रीचे ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीक़डून व्यवस्थापन पाहिले जात आहे.

कॅत्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश शर्मा म्हणाले, “आम्हाला आमच्या एनसीडीच्या सार्वजनिक विक्रीची घोषणा करताना आनंद होत आहे. आमची कंपनी ही एक वैविध्यपूर्ण रिटेल-केंद्रित प्रणालीगत महत्त्वाची ठेवी न स्वीकारणारी बँकेतर वित्तीय कंपनी (“एनबीएफसी”) आहे, जी एमएसएमई कर्जे, गृह कर्जे, सुवर्ण कर्जे आणि बांधकाम वित्त यासारख्या चार प्राथमिक कर्ज विभागांद्वारे सुरक्षित आणि तारणयुक्त कर्जाची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करते. स्थापित उपस्थिती, मजबूत अंमलबजावणी क्षमता आणि भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रातील १४ वर्षांहून अधिक अनुभवासह, आम्ही भारतातील या विभागांच्या वाढीच्या क्षमतेने सादर केलेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत.”

एनसीडी मासिक आणि वार्षिक व्याज पर्यायासह वार्षिक ८.५५% ते ९.७०% पर्यंतचे कूपन दर देतात. एनसीडीमध्ये १८ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने असे चार मुदत कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत. खालील तक्त्यामध्ये एनसीडीच्या प्रत्येक मालिकेसाठी कूपन दर आणि कालावधीसह सर्व तपशीलांचा उल्लेख आहे. विक्रीपश्चात हे एनसीडी मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.