मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पुणे येथे संपन्न
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भाने मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, मतदारसंघनिहाय नियोजन तसेच संघटनात्मक बळकटी यावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, दिलीपभाऊ कांबळे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंडलाध्यक्ष आदी उपस्थित होते.