नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन… कन्यांचे पूजन करून पाटील यांनी केले देवीरूपाला वंदन
पुणे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात कन्यापूजन हा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक कन्यापूजन केलं.
नामदार चंद्रकांत पाटील यांनी स्वत: मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक पद्धतीने सात मुलींचे पूजन केले. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. केवळ कोथरूड भागातील नव्हे तर सर्व पुणे शहरातून या सोहळ्यासाठी मुलींनी व त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.
हा सोहळा आतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला असल्याच्या भावना पाटील यांनी व्यक्त केल्या. या सोहळ्यात माझ्या कोथरूडमधील कन्यांचे पूजन करून देवीरूपाला वंदन केले. कोथरूड मधील कन्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे एक विलक्षण समाधान प्राप्त झाले, असल्याचे पाटील यांनी म्हटले. कन्यापूजन करून असे अधोरेखित करून देणे गरजेचे आहे कि स्त्री हि आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे. यासोबतच स्त्रीला देखील हि जाणीव झाली पाहिजे कि ती खूप मजबूत आहे. यासाठी हे कन्यापूजन असल्याचे पाटील म्हणाले.
मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच मागीलवर्षीपासून कोथरूड मध्ये महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे.