उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याबाबत बैठक संपन्न
मुंबई, ०७ ऑक्टोबर : मंत्रालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याबाबत बैठक पार पडली.
अकोल्यात उपकेंद्र सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमून या समितीने उपकेंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करावी आणि येत्या मंगळवारपर्यंत सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, आमदार रणधीर सावरकर, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्यापीठाचे रजिस्टार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.