Latest Marathi News

BREAKING NEWS

अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट

0

मुंबई, ११ नोव्हेंबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान सिंहगड येथे आज अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने त्यांची सदिच्छा भेट घेतली . आरोग्यसेवा सुधारण्यासाठी तसेच रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी ही भेट घेण्यात आली.

या भेटीदरम्यान आरोग्य सुविधा, उपचार पद्धती तसेच राज्यातील रुग्णांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस लीड – HPB आणि Liver Transplant Program (Western Region) डॉ. गुरुप्रसाद शेट्टी, Chief Operating Officer डॉ. किरण शिंगोटे, Medical Services Director डॉ. रवी शंकर, Senior Manager, Transplant Program तबरेज शिरगावकर आणि Solid Organs Transplant Program National Head संजय कुमार सिंह उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.